नाशिक: कत्तलीसाठी आणलेल्या गायींची सुटका; गुन्हेशाखा युनिट एकची कारवाई; एकाला अटक

नाशिक (प्रतिनिधी): भद्रकालीतील बागवान पुऱ्यात कत्तलीसाठी गायी आणल्या असता, दबा धरून असलेल्या शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने एकाला अटक केली. तसेच कत्तलीच्या उद्देशाने आणलेल्या तीन गायीची सुटका केली. वाहनांसह सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

सद्दाम अन्वर पाटकरी (३३, रा. जोगवाडा, मुलतानपुरा, भद्रकाली) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे अंमलदार रमेश कोळी यांना बागवान पुऱ्यातील बिरबल आखाड्यात जिवंत गोवंशीय जनावरांना कत्तलीसाठी आणण्यात येणार असल्याची खबर मिळाली होती. यासंदर्भातील माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देण्यात आली. त्यानुसार, बुधवारी (ता. २०) पहाटेच्या सुमारास बागवानपुऱ्यात सापळा रचण्यात आला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: णमोकार तीर्थ महोत्सवासाठी प्रस्तावित कामे 30 जानेवारीपर्यंत पूर्ण करावीत

पहाटेच्या सुमारास बागवानपुऱ्यात टाटा कंपनीचा छोटा हत्तीतून (एमएच १५ सीके ९५६२) संशयित सद्दाम पाटकरी हा दोन जिवंत गायी कत्तलीच्या उद्देशाने घेऊन आला. त्यावेळी दबा धरून असलेल्या पथकाने त्यास ताब्यात घेत टेम्पोसह गायी जप्त केल्या. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: युवकाच्या खूनप्रकरणी महिलेसह चौघांना जन्मठेप !

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनिरीक्षक गजानन इंगळे, रमेश कोळी, देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, राजेश राठोड, समाधान पवार, गांगुर्डे, सोनवणे यांनी बजावली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790