नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील मखमलाबाद शिवार येथे १०१ किलो वजनाचा एकूण २० लाख ३७ हजार ६०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. दि. १८ मार्च २०२३ रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास मानकर मळा, मखमलाबाद शिवार येथे ज्ञानेश्वर बाळू शेलार (वय: ३२, हल्ली रा. जयशंकर रो हाऊस नं. ८, श्रीकृष्ण मंदिराजवळ, मानकर मळा, मखमालाबाद, तर मूळ राहणार: घर नं. १९३, वावरे लेन, भद्रकाली, नाशिक) तसेच निलेश अशोक बोरसे (वय: २७, राहणार: रो हौस नं. १ बी १, मातोश्री निवास, पुष्कर व्हॅली अपार्टमेंट, औदुंबर नगर, अमृतधाम, पंचवटी) यांच्या एसेन्ट कारच्या (एम एच १५, बी क्यू ०७७८) डिक्कीमध्ये एकूण २० लाख ३७ हजार ६०० रुपये किमतीचा १०१ किलो ८८० ग्रॅम वजन असलेला गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करतांना मिळून आला. याबाबत दोघांवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस (गुन्हे) आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे व सहायक पोलीस आयुक्त भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, सहायक पोलीस निरीक्षक तोडकर, पोलीस उपनिरीक्षक लाड, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, पोलीस हवालदार: संजय ताजणे, देवकिसन गायकर, किशोर रोकडे, गणेश भामरे, डंबाळे, पोलीस नाईक: भूषण सोनवणे, दिघे, चकोर, पोलीस अंमलदार: वडजे, येवले, सानप, नांद्रे, बागडे, निकम, फुलपगारे, राऊत यांनी केली.