सिटी लिंक बस संपाच्या पार्श्वभूमीवर ‘मनसे’ने सोमवारी पालिकेच्या आयुक्तांना चप्पल व शाईची भेट देत २ दिवसांत बस सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे..
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): रखडलेल्या वेतनासाठी सिटीलींकच्या वाहकांनी पुकारलेल्या संपाचा पाचवा दिवस उलटूनही तोडगा निघालेला नाही. परिणामी दोनशेहून अधिक बस डेपोच्या बाहेर न पडल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांची अडचण झाली.
पालिकेकडून संप मिटवण्यासाठी पावले उचलली जात नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. दरम्यान सोमवारी ‘मनसे’ने आयुक्तांची भेट घेत दोन दिवसांत संप मिटला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
२ महिन्याचे रखडलेले वेतन व ५०% कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी सिटी र्लीकच्या वाहकांनी गुरुवारपासून संप पुकारला आहे. ऐन परीक्षाकाळात बससेवा ठप्प झाल्याने विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका बसतो आहे. विशेष म्हणजे ठेकेदाराला यापूर्वीच वेतनाचे सर्व पैसे दिल्याचे सांगत पालिका व सिटी लिंक या संपातून हात झटकत आहे. दुसरीकडे मात्र वेतन मिळेपर्यंत बस सुरू करणार नसल्याची भूमिका संपकऱ्यांनी घेतली आहे.
२५० पैकी २०० बसेस ४ दिवसांपासून तपोवन डेपोत उभ्या आहेत. बसेस बंद असल्याने खासगी वाहतूकदारांकडून अव्वाचे सव्वा भाडे आकारात आर्थिक लूट केली जात आहे.
सिटी लिंक बस संपाच्या पार्श्वभूमीवर ‘मनसे’ने सोमवारी पालिकेच्या आयुक्तांना चप्पल व शाईची भेट देत २ दिवसांत बस सुरून झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे..
“सध्या परीक्षा सुरू आहेत. महापालिका आणि ठेकेदार यांच्यातील वादामुळे मात्र आमचे हाल होत आहेत. आम्ही पास काढलेला आहे. त्या पैशांचे काय ? यांचा नेहमीच संप होतो आणि विद्याथ्यांना वेठीस धरले जाते. यावर तत्काळ तोडगा काढावा..” अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.