नवी दिल्ली: देशातील लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. यासोबतच काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही जाहीर होणार आहेत.
लोकसभा आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक आयोगाने आज (शनिवार) दुपारी ३ वाजता पत्रकार परिषदेत सांगिलते. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून रोजी संपत असून त्यापूर्वी नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कूमार यांनी ही घोषणा केली आहे.
लोकसभेच्या निवडणुका १९ एप्रिल २०२४ पासून निवडणुकांना सुरुवात होणार आहे. दिड कोटी कर्मचारी निवडणूक पार पाडतील. देशात ९७ कोटीहून अधिक मतदार आहेत. तर साडे दहा लाखांहून अधिक मतदान केंद्र आहेत. ७ टप्यांमध्ये निवडणुका होणार आहेत.
- पहिल्या टप्प्यात -19 एप्रिल
- दुसऱ्या टप्प्यात – 26 एप्रिल
- तिसरा टप्पा – 7 मे
- चौथा टप्पा – 13 मे
- पाचवा टप्पा – 20 मे
- सहावा टप्पा – 25 मे
- सातवा टप्पा – 1 जून
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790