नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मित्राचा वाद मिटविणे एका तरूणास चांगलाच महागात पडला आहे. दुकलीने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करीत जखमी केले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश चौधरी व अनिकेत डगळे अशी तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत मंगेश सुभाष शिंदे (२१ रा.नर्गिस दत्त शाळेजवळ, टकलेनगर) या जखमी युवकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे गरूवारी (दि.१४) दुपारच्या सुमारास परिसरातील कृष्णनगर गार्डन परिसरात गेला असता ही घटना घडली.
गार्डन मध्ये दोघे संशयित शिंदे याच्या मित्रास शिवीगाळ व दमदाटी करीत होते त्यामुळे त्याने वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता संतप्त दोघांनी त्याच्यावर काही तरी धारदार वस्तूने सपासप वार केले. या घटनेत मंगेश शिंदे जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.