अनैतिक संबंधांच्या संशयातून दाजीवरही कोयत्याने केले वार
नाशिक (प्रतिनिधी): पाणी भरण्यासाठी विवाहिता गेली असता तिचा तोल जाऊन पडल्याने डोक्याला दुखापत होऊन ती गंभीररीत्या जखमी झाली व दाजीचाही अपघात झाल्याने तोही जखमी झाल्याचा बनाव करत दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणाऱ्या विवाहितेचा पती हाच तिचा खुनी निघाल्याची धक्कादायक घटना सिव्हिल पोलिस चौकीच्या अंमलदारांच्या सतर्कतेने गुरुवारी (दि. १४) उघडकीस आली.
नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील निफाड तालुक्यातील तामसवाडी गावात राहणारा मनोज रमेश पोतदार (३३) हा त्याची पत्नी वर्षा पोतदार (२९), दाजी बाळू शेवरे (३०) यांना जखमी अवस्थेत घेऊन नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात आला.
दारूचे व्यसन असलेल्या मनोज आणि वर्षा यांच्यामध्ये सतत खटके उडत होते. त्याने बुधवारी कोयत्याने तिच्यावर वार केले. याचवेळी त्याचा दाजी लाला वाळू शेवरे हा मध्ये पडल्याने त्याच्यावरही कोयता चालविला. यामध्ये तोही जखमी झाला. त्यामुळे या दोघांना त्याने चांदोरीच्या प्राथमिक रुग्णालयात नेले. तेथून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी वर्षा हिला तपासून मयत घोषित केले. यानंतर मनोज हा पोलिस चौकीत एमएलसी नोंदविण्यासाठी आला.
त्याने बायकोची एमएलसी नोंदवून निघून गेला. दरम्यान, शेवरे याच्या फिर्यादीवरून मनोजविरुद्ध सरकारवाडा पोलिसांनी खुनासह प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सायखेडा पोलिसांनाही माहिती कळविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
📌 मनोज हा पुन्हा काही वेळाने चौकीत आला आणि दाजी लाला शेवरे हा जखमी झाल्याची एमएलसी नोंदवून घ्या, म्हणाला.
📌 यावेळी पोलिसांनी त्याला कारण विचारताच त्याची भंबेरी उडाली. तो नेमका कसा जखमी झाला, हे त्याला सांगता आले नाही. तो कधी अपघात सांगायचा तर कधी शेतात पडला, असे सांगू लागला.
यावेळी पोलिसांनी त्याला कारण विचारताच त्याची भंबेरी उडाली. तो नेमका कसा जखमी झाला, हे त्याला सांगता आले नाही. तो कधी अपघात सांगायचा तर कधी शेतात पडला, असे सांगू लागला.
📌 ग्रामीण पोलिस दलाचे उपनिरीक्षक ए. एन. आव्हाड, हवालदार किसन काळे आणि शहर पोलिस दलाचे हवालदार प्राज्योक्त जगताप, अंमलदार शरद पवार यांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने पत्नीसह दाजीवर कोयत्याने वार केल्याची कबुली दिली.