नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): उंटवाडीतील खेतवाणी लॉन्स भागात भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ४२ वर्षीय पादचारी ठार झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भारत गुलाब बहारे (रा.महाराष्ट्र पोलीस अकादमी,नाशिक) असे मृत इसमाचे नाव आहे. बहारे रविवारी (दि.१०) रात्रीच्या सुमारास सिडकोतील त्रिमुर्ती चौकातून महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या दिशेने पायी जात असतांना हा अपघात झाला. उंटवाडी परिसरातील खेतवाणी लॉन्स समोरून तो पायी जात असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात दुचाकीने त्यास धडक दिली.
या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने अभिषेक मालुंजकर यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता सोमवारी सकाळी उपचार सुरू असतांना त्यास डॉ.सतिष मिना यांनी तपासून मृत घोषीत केले.