नाशिक: ‘त्या’ व्यावसायिकाचे अपहरण करून १२ लाखांची खंडणी उकळणारी टोळी जेरबंद !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): सोमवारी म्हणजेच ४ मार्च रोजी बापू पुलाजवळून राजेशकुमार गुप्ता यांचे अपहरण करून त्यांच्याकडून १२ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली होती. या गुन्ह्यातील तीन आरोपींना पकडण्यात गुन्हे शाखा युनिट १ ला यश आले आहे.

सोमवारी (दि. ४ मार्च) फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणारे पंचवटीतील राजेशकुमार गुप्ता यांचे शस्त्राचा धाक दाखवत अपहरण करण्यात आले होते.  व्यावसायिकाच्या पत्नीने अपहरणकर्त्यांच्या साथीदाराला नाशिकमध्ये १२ लाख रुपये दिल्यानंतर गुप्ता यांना मध्य प्रदेशमध्ये सोडून देण्यात आले होते. त्यानंतर नाशिकला येऊन गुप्ता यांनी फिर्याद दिली होती.

हे ही वाचा:  नाशिक: घरफोडी करणारी सराईतांची टोळी जेरबंद; २५ तोळे सोन्यासह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त !

या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ ने सुरु केला होता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्यातील आरोपींचे नाव तुषार खैरनार, अजय प्रसाद, आदित्य सोनवणे आणि त्यांचे साथीदार असल्याचे निष्पन्न झाले.

त्याप्रमाणे दोन पथके तयार करण्यात आली. त्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर आणि त्यांच्या पथकाने अंबड लिंक रोड, दत्त मंदिराजवळ आदित्य एकनाथ सोनवणे (वय: २४, रा. म्हाडा कॉलनी, अंबड लिंक रोड, नाशिक) याला पकडले. आदित्यने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून यामाहा कंपनीची मोटारसायकल, अॅपल कंपनीचा मोबाईल फोन, दोन सोन्याच्या कानातील रिंग, रोख रक्कम रूपये २९,५००/-रु. असा एकुण १,५९,०००/-रूपये किमतीचा मुदद्देमाल हस्तगत केला.

हे ही वाचा:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज 'स्वर सावाना'त संवादिनी, मोहनवीणा, तबला वादन

तर पोलिस उपनिरीक्षक रविंद्र बागुल यांचे पथकाने आरोपी तुषार केवल खैरनार (वय: २८ वर्षे, रा. रिध्दी सिध्दी अपार्ट, म्हसरूळ नाशिक), अजय सुजीत प्रसाद (वय-२४ वर्षे रा. अंबड लिंकरोड, नाशिक) यांना म्हसरूळ लिंक रोड येथे सापळा लावुन पकडले.

हे ही वाचा:  नाशिक: 1 ,2 व 3 बीएचके या पारंपरिक फ्लॅट्ससोबतच ग्राहकांचा कल 4-5 बीएचके, स्टुडिओ अपार्टमेंटकडे...

त्यांनी गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांना ताब्यातुन शेवरलेट कंपनीची कुझ कार, व्हीवो कंपनीचा मोबाईल फोन, अॅपल कंपनीचा मोबाईल फोन, रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन असा एकुण ३,८७,०००/- रूपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर गुन्हयामध्ये नमुद आरोपीतांकडुन एकुण ६,१६,०००/- रूपये किमतीचा मुदद्दे‌माल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर आरोपींना पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790