नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): येथील एकलहरे रोड वर गवळी बाबा मंदिर जवळ पहाटेच्या सुमारास झाडावर कार आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, एकलहरे रोड वरील गवळी बाबा मंदिरा जवळ बुधवारी (ता. 6) पहाटेच्या सुमारास एकलहरे कडे भरधाव वेगाने जाणारी कार (एमएच 14 सीसी 9632) रस्त्याच्या बाजूला असेलल्या निलगिरीच्या झाडावर आदळून अपघात झाला.
या अपघातात रोहित राजेंद्र रणशूर (वय 34, रा. मोहिते गॅरेज मागे, अरिंगळे मळा, नाशिकरोड) हा मृत झाला असून अंशू भाऊसाहेब वाघ (वय 18, रा. जाधव संकुल, पळसे), सिद्धार्थ राजेंद्र रणशूर (वय 32, रा. हरिविहार सोसायटी, जेलरोड), व युनित राजू सरोदे (वय 24, रा. खडकी, पुणे) हे तीन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, गुन्हे शाखेचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत रोहीत रणशूर हा नाशिक औष्णिक वीज केंद्रातील कर्मचारी असल्याचे समजते.