नाशिक (प्रतिनिधी): शहर व परिसरात अद्यापही चोरी छुप्या पद्धतीने एम. डी. ड्रग्ज (मॅफेड्रॉन) पावडरची पुड्यांमध्ये विक्री केली जात आहे. गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने फेब्रुवारी महिन्यात आडगाव शिवारात हनुमाननगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका पेडलरला शिताफीने जाळ्यात घेतले होते. त्याचा एक साथीदार हा पोलिसांना हवा होता. त्याचा माग काढत पोलिसांनी बळी मंदिर परिसरातून अटक केली आहे.
नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाकडून ‘ड्रग्ज मुक्त नाशिक’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांनी ड्रग्जविरोधी कारवाया करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले आहेत. यानुसार गुन्हे शाखेची पथके अधिकाधिक सक्रिय झाली आहेत. युनिट-१ चे अंमलदार नितीन जगताप यांना पेडलर बळी मंदिर परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठ
पोलिस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार यांना कळविली. तातडीने सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाला सापळा रचण्याचे आदेश त्यांनी दिले. पथकाने शिताफीने आरोपी राहुल नारायण शिंदे (रा. हनुमाननगर, अमृतधाम) असे अटक करण्यात आलेल्या पेडलरचे नाव आहे. शिंदे हा धम्मराज ऊर्फ सागर बाळासाहेब शार्दूल (रा. राजवाडा, दिंडोरी रोड) यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली होती. पथकाने त्याच्याकडून २७ हजार ५०० रुपयांचे ५.५ ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले होते. त्याच्याविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.