नाशिक (प्रतिनिधी): जेलरोड परिसरातील सम्राट चौकात प्राणघातक हल्ल्यातला पसार झालेल्या संशयितास शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. प्रदीप उर्फ सोनू सोमनाथ कापसे (२८, रा. पहाडी बाबा झोपडपट्टी, एकलहरा, नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे.
गेल्या १६ फेब्रुवारी रोजी जेलरोडच्या भीमनगरमधील सम्राट चौकात संशयित विजय सरजित बहेनवाल उर्फ छग्गा (रा. फर्नांडिसवाडी, जय भवानी रोड), राहुल उज्जैनवाल (रा. फर्नांडिसवाडी), गणेश सोनवणे (रा. नारायण बापूनगर) यांच्यासह आणखी तिघांनी मयूर विजय रोहम (रा. उत्सव विहार अपार्टमेंट, नालंदा सोसायटी, जेलरोड) याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता.
या घटनेपासून संशयित कापसे फरार होता. दरम्यान, युनिट एकचे अंमलदार प्रकाश भालेराव यांना संशयित कापसे यांची खबर मिळाली होती. त्यानुसार युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून संशयित सोनू कापसे यास एकलहरे परिसरातून शिताफीने सापळा रचून अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी युनिटचे वरिष्ठ निरीक्षक विद्यासागर श्रीमानवार, सहायक निरीक्षक सचिन जाधव, बाळू शेळके, शंकर काळे, प्रकाश भालेराव, सुनील आहेर, प्रवीण वानखेडे यांनी कामगिरी बजावली.