नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकानेच आपल्या शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा सहलीच्या प्रवासादरम्यान विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की संशयित भाऊसाहेब किसन सानप (रा. कॅनडा कॉर्नर, नाशिक) हे शाळेतील विद्यार्थ्यांसह मालवण येथे सहलीला गेले होते. दि. ५ जानेवारी रोजी रात्री २ ते सकाळी
६ वाजेच्या दरम्यान मालवणहून नाशिकला येत असताना सानप यांनी पान खाऊन खिडकीतून थुंकण्याच्या बहाण्याने दोन विद्यार्थिनींच्या शेजारी बसून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. पीडित विद्यार्थिनींनी याबाबत आपल्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी सानप यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ७०/२०२४). पुढील तपास सरकारवाडा पोलीस करीत आहेत.