सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानमित्त आयोजन
नाशिक (प्रतिनिधी): पंचवटीतील इंद्रकुंडासमोरील – अॅड. उत्तमराव नथूजी ढिकले पंचवटी सार्वजनिक वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त खुल्या गटासाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या खुल्या निबंध स्पर्धेसाठी ‘वाचन छंद : सर्वोत्तम छंद’, ‘गावोगावी असावे देवालय आणि ग्रंथालय’, ‘जो ग्रंथ वाचतो तोच महान होतो’, ‘वाचनसंस्कृती वाढणे ही काळाची गरज’ हे विषय देण्यात आले आहेत. यापैकी कोणत्याही एका विषयावर स्पर्धकांनी 400 शब्दांत व कागदाच्या एकाच बाजूने सुवाच्च अक्षरात निबंध लिहून वाचनालयाच्या वेळेत रविवार सोडून सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत १ ते १५ मार्चपर्यंत ग्रंथपालाकडे जमा करावा, असे आवाहन वाचनालयाचे कार्यवाह ग्रंथमित्र नथूजी देवरे यांनी केले आहे. गुढीपाडव्याला विजेत्यांना बक्षिसे दिली जातील.
प्रथम पुरस्कार ५०१ रुपये, द्वितीय ३५१ रुपये, तृतीय २५१ रुपये तर २०१ रुपयांचे दोन उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येतील. निबंध स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.