नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): स्मार्ट सिटी कंपनीमार्फत विविध कामे करण्यासाठी गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथील कामकाज बंद ठेवले जाणार असल्यामुळे शनिवारी शहरातील अठरा प्रभागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
या प्रभागात पाणीपुरवठा बंद : पंचवटीतील प्रभाग क्रमांक १ ते ६, नाशिकरोडमधील १७ ते २२, गांधीनगर येथील १६ व २३ भागशः, नाशिक पश्चिममधील ७, १२, १३, १४ येथे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
स्मार्ट सिटी कंपनीमार्फत बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र येथे रॉ वॉटर पाइपलाइनमधून कनेक्शन करणे, ६०० मी.मी. व्यासाचे पवननगर रायझिंग मेनचे कनेक्शन जोडणीचे नियोजन आहे. यामुळे बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र, निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्र, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र, नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्र येथे होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच रविवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी प्रमाणात कमी दाबाने होणार आहे.