नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी दाखल गुन्ह्यात तिघा संशयितांना जिल्हा न्यायालयाने एक मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात श्याम आडगावकर व शंकर गोडसे या दोघांना अटक केलेली आहे.
गिरीश पोतदार यांच्या फिर्यादीनुसार गेल्या आठवड्यात अंबड पोलिस ठाण्यामध्ये आडगावकर सराफचे श्याम आडगावकर, महेश आडगावकर, सागर आडगावकर, शंकर गोडसे, मयूर शहाणे आदींविरोधात सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
यात संशयित मयूर शहाणे, राजेंद्र शहाणे व सागर आडगावकर यांनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सोमवारी (ता.२६) सुनावणी होऊन तिघांना अंतरिम जामीन मंजूर केला. तर गुन्ह्याचा तपास शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग असून श्याम आडगावकर व शंकर गोडसे बुधवार (ता.२८) पर्यंत पोलिस कोठडीत आहेत.