नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): रविवार कारंजासह बाजारपेठेतील वाहनतळाचा प्रश्न, वाहतूक कोंडी सुटण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा यशवंत मंडईच्या पाडकामाला २४ भाडेकरू, व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. २७) मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. नगरपालिका काळात रविवार कारंजावर बांधलेली यशवंत मंडई धोकादायक झाली आहे. बाजारपेठेतील वाहतूक कोंडी
सुटण्याच्या दृष्टीने येथे बहुमजली वाहनतळ व्हावे अशी मागणी माजी नगरसेविका स्व. सुरेखा भोसले यांनी केली होती. त्यासंदर्भात स्मार्ट सिटी कंपनीने पीपीपी तत्त्वावर बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याची व्यवहार्यतेच्या कारणामुळे प्रकल्प पालिकेकडे आला. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये इमारत धोकेदायक असल्याचे समोर आल्यानंतर इमारत पाडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र २४ भाडेकरूंनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर मंगळवारी अंतिम सुनावणी होणार आहे.