नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मेरी म्हसरूळ लिंकरोडवरील गोरक्षनगर भागात दुचाकीस्वार त्रिकुटाने कुठलेही कारण नसतांना एकावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत सदर इसम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष किसन अंचाळे (३९ रा.आरटीओ मागे.गोरक्षनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अंचाळे शनिवारी (दि.२४) सकाळच्या सुमारास परिसरातील लक्ष्मी बेकरी भागात रस्त्याच्या कडेला उभे असतांना ही घटना घडली.
दुचाकीवर आलेल्या तीन जणांच्या टोळक्याने आमच्याकडे का बघतो याबाबत जाब विचारला असता अंचाळे यांनी मी येथेच राहत असल्याचे सांगितल्यानंतर हा हल्ला झाला.
दोघांनी दुचाकीवरून उतरत त्यांना शिवीगाळ करीत थेट लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत एकाने त्यांच्या चेह-यावर आणि हातापायावर व पोटावर चाकूने वार केल्याने अंचाळे गंभीर जखमी झाले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक: ४४/२०२४.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790