नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेखाली अमृत प्रोजेक्ट अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन परियोजनेच्या द्वितीय टप्प्याचा शुभारंभ यमुना नदीचा छठ घाट, दिल्ली येथून करण्यात आला.
बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या शिकवणूकीतून प्रेरित अशी ही परियोजना भारताच्या २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील १५३३ ठिकाणी अकरा लाखाहून अधिक स्वयंसेवकांच्या सहभागाद्वारे विशाल रुपात यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली. पंचवटी नाशिक येथे गोदावरी नदी व परिसरात राबविलेल्या मोहिमेत सुमारे दोन टन ६८० कचरा संकलित करण्यात आला.
सकाळी आठ वाजे पासुन सुरू झालेल्या मोहीमेचा शुभारंभ विभागीय आयुक्त कार्यालयाच्या उपायुक्त मंजिरी मोनालकर, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सामाजिक कार्यकर्त्या कल्पना पांडे, संत निरंकारी मंडळाचे सेक्टर संयोजक गुलाब पंजवाणी, मनपा स्वच्छता निरिक्षक संजय दराडे, क्षेत्रीय संचालक वासुदेव भोईर व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वच्छतेची प्रार्थना व शपथ घेऊन करण्यात आला.
यावेळी पंचवटी, सातपुर, नवीन नाशिक, जेलरोड, देवळाली कॅम्प , दिंडोरी सह जिल्ह्यातून दोनशे पन्नास सेवादल तर सहाशेहून अधिक निरंकारी बंधु भगिनी सहभागी झाले होते. यावेळी नदीतील पाणवेली, जुनाट कपडे तसेच परिसरातील कचरा गोळा करण्यात आला. कचरा उचलण्यासाठी वॉटरग्रेसचे ४५ कर्मचारीही सहभागी होऊन संपूर्ण कचरा खत प्रकल्पावर नेण्यात आला.
मोहिमे नंतर संपूर्ण परिसर चकाचक दिसत होता. प्रोजेक्ट अमृत’च्या द्वितिय टप्प्याचा प्रारंभ करताना निरंकारी राजपिता रमितजी यांनी सद्गुरु माताजींच्या आशीर्वचनापूर्वी आपल्या संबोधनामध्ये म्हटले, की बाबा हरदेवसिंहजी यांनी आपल्या जीवनात आम्हाला हीच प्रेरणा दिली, की सेवा निष्काम भावनेनेच व्हायला हवी. सद्गुरु माताजींनी प्रोजेक्ट अमृत प्रसंगी आपल्या पावन आशीर्वचनामध्ये सांगितले, की आपल्या जीवनात पाण्याला फार महत्व आहे, जल हे अमृतासमान होय. जल आपल्या जीवनाचा मुलभूत आधार आहे. परमात्म्याने आपल्याला ही जी स्वच्छ व सुंदर सृष्टी बहाल केली आहे तिची देखभाल करणे आमचे कर्तव्य आहे.
मानवी रूपातच आपण या अमूल्य अमानतीचा दुरुपयोग करुन ती प्रदूषित केली आहे. आपण प्रकृतीला तिच्या मूळ रुपात प्रतिष्ठापित करुन तिची स्वच्छता करायला हवी. हे आपण आपल्या कर्मातून सांगायला हवे केवळ शब्दांतून नव्हे. कणाकणातून व्याप्त परमात्म्याश्याी जेव्हा आपले नाते जोडले जाते आणि आपण याचा आधार घेऊ लागतो तेव्हा याच्या रचनेवरही आपले प्रेम जडते. आपण या जगात आलो आहोत तर या धरतीला आणखी सुंदर रुपात सोडून जाण्याचा आपला प्रयास असायला हवा.
अन पाणवेली काढल्याच:
स्वच्छता मोहिम सुरू झाल्या नंतर नदीमध्ये काही भागात मोठया प्रमाणात पाणवेली होत्या. निरंकारी बांधवांनी त्या बघितल्यावर तेथील काही जण म्हणाले की त्या पाणवेली निघुच शकत नाही मात्र निरंकारी सेवादल नदीत होडीच्या सहाय्याने पाणवेली बाहेर काढल्या व नदी स्वच्छ केली.