नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहरात उघडकीस आलेले एमडी ड्रग्ज प्रकरण व सध्या राज्यात सुरू असलेल्या कारवाईची नाशिक पोलिसांनीही गंभीर दखल घेतली असून आता नाशिक पोलिसांकडून शहरातील सर्व गोदाम आणि पानटपऱ्यांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे.
काही महिन्यांपूर्वी शिंदे एमआयडीसी येथे कारवाई झाली होती. या प्रकरणाची पाळेमुळे संपूर्ण राज्यात देखील पसरल्याचे समोर आले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुणे येथेदेखील कोट्यवधी रुपयांचा एमडी बनविण्याचा कारखाना उघडकीस आल्याने शहर पोलिसांनीदेखील पावले उचलली आहे.
शहर परिसरातील गोदामांची तपासणी करत त्या ठिकाणी कोणत्या उत्पादनाची साठवणूक केली जाते याबाबत माहिती घेतली जाणार आहेत. याबरोबरच ड्रग्ज, एमडी, गांजाची पानटपऱ्याच्या माध्यमातून विक्री होत असल्याने पोलिसांनी शहरातील सर्व पानटपऱ्यांची नोंद करण्यास सुरुवात केली आहे.