नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहर-जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुंडाला गुन्हेशाखेच्या विशेष शाखेने म्हसरुळ लिंकरोड परिसरातून अटक केली. रितेश भाऊसाहेब चव्हाण (२३, रा. वज्रमुद्रा अपार्टमेंट, सप्तरंग सोसायटीमागे, पेठरोड) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
शहर गुन्हेशाखेच्या विशेष शाखेचे अंमलदार दत्तात्रय चकोर, गणेश वडजे यांना तडीपार गुंड म्हसरुळ लिंक रोड परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती.
त्यानुसार, पथकाने राऊ हॉटेलच्या मागे असलेल्या चाणक्यपुरी सोसायटी परिसरात सापळा रचून त्यास अटक करण्यात आली. तडीपारी आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कामगिरी पथकाचे पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, हवालदार किशोर रोकडे, भारत डंबाळे, दत्तात्रय चकोर, भूषण सोनवणे, गणेश वडजे यांच्या पथकाने बजावली.