नाशिक: गंगापूरला वाहने फोडणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): गंगापूर गावातील पालिकेच्या कमानीजवळ रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांवर दगडफेक करणाऱ्या टोळीची पोलिसांनी गावात धिंड काढत त्यांच्याकडून ‘पुन्हा असे कृत्य करणार नाही, केलेच तर कठोर कारवाई करावी’ असे वदवून घेतले. गंगापूर पोलिसांनी पाच संशयितांना अटकही केली असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे.

गंगापूर गावातून शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर मंगळवारी (दि. १३) दगडफेक करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच संशयितांना अटक करण्यात आली. संशयितांची गावात धिंड काढण्यात येऊन त्यांच्याकडून पुन्हा असे कृत्य करणार नसल्याचे वदवून घेण्यात आल्याने गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

हे ही वाचा:  नाशिक: छतावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी महावितरणतर्फे मोफत नेट मीटर

अनिकेत ऊर्फ अंड्या शार्दूल, प्रतीक जाधव, विजय खोटरे, कपिल ऊर्फ चिंटू गांगुर्डे, रोहित वाडगे (सर्व गंगापूर गाव) यांची पथकाने सायंकाळी गावातील रस्त्यावर आणि ज्या ठिकाणी वाहने फोडली त्या ठिकाणी धिंड काढली. वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे, मोतीलाल पाटील, गिरीश महाले, रवींद्र मोहिते, गणेश रेहरे, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

हे ही वाचा:  नाशिक: शेल्टर 2024:9000 कुटुंबांनी दिली प्रदर्शनास भेट; 60 कुटुंबांची झाली गृह स्वप्नपूर्ती

वादातून घडले कृत्य:
संशयित टोळीचे सदस्य मद्यपान अंमली पदार्थांचे सेवन करण्याकरीता मनपाच्या कमानीखाली ठिय्या देत होते. येथे दोन गटाता वाद झाल्याने आपले वर्चस्व दाखवण्याकरीता वाहनांवर दगडफेक केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या वाहनांची केले होती तोडफोड:
टोळीने एमएच १५ एचक्यू ०७१० कारवर दगडफेक करत नुकसान केले. कारमधील कुशल भगत, ओमकार वाळुंज यांनी जाब विचारला असता टोळीने पुन्हा दगडफेक करत कारच्या काचा फोडत चाकूचा धाक दाखवत जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. मयूर मोरे यांची एमएच १५ डीएम ८२३२, विजय रसाळ यांचा टेम्पो एमएच १६ एड्र ४८५२ या वाहनांची दगडफेक करत काचा फोडून नुकसान केलेहोते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790