नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): आर्थिक देवाणघेवाण कारणावरून नवीन सिडकोतील सराईत गुन्हेगार संदेश काजळे याच्या खून प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दोघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आरोपी स्वप्निल उन्हवणे व पवन भालेराव यांना पोलिसांनी अटक केली आहे.
तीन दिवसांपूर्वी (दि.९) रात्री सराईत गुन्हेगार काजळे निमाणी बस स्टैंडसमोर असलेल्या सूर्या हॉस्पिटलच्या मागे असलेल्या पार्किंगमध्ये संशयित आरोपी नितीन चौघुले, रणजित अहिरे, स्वप्निल उन्हवणे व इतर दोघेजण यांच्याबरोबर दारू पित असतांना त्यांच्यात आर्थिक देवाणघेवाण वरून वाद झाले होते. त्यावेळी उन्हवणे याने काजळे याची गच्ची पकडून शिवीगाळ केली होती तर अहिरे याने काजळे याच्या डोक्यात काचेची बिअर बाटली फोडली होती.
काजळे याने त्याच्या चुलत भावाला फोन करून बोलविले असता संशयितांनी त्यालाही मारण्याचा प्रयत्न केला होता. चारचाकी वाहनात काजळे याला जबरीने बसवून नेत मोखाडा घाटात जंगलात नेऊन त्याच्यावर शस्त्राने वार करत खून केल्याचे उघडकीस आले. फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोघांची कोठडी मागितली.