नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की संशयित आरोपी हर्षद रामचंद्र जाधव (वय ३२, रा. खोकरविहीर, ता. सुरगाणा) व फिर्यादी पीडित महिला हे एकमेकांशी परिचित आहेत. दरम्यान, आरोपी हर्षद जाधव याने या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून दि. २८ ते ३० मे २०२३ दरम्यान पेठ रोड येथे तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
पीडितेने लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्नास नकार दिला. अखेर पीडित महिलेने म्हसरूळ पोलीस ठाणे गाठून आरोपी हर्षद जाधव याच्याविरुद्ध अत्याचाराची फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आहिरे करीत आहेत.