नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): डिस्ने -हॉटस्टार ॲपचे सबक्रिशन अपग्रेड करण्याच्या नावाखाली सायबर भामट्याने ऐनीडेस्क ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले.
यामुळे सायबर भामट्याने मोबाईलचा ॲक्सेस घेत इंटरनेट बँकिंगचा वापर करीत महिलेच्या बँक खात्यातून तब्बल १० लाख ५० हजार रुपये काढून घेत गंडा घातला आहे.
आदिती दिपंकर चटर्जी (रा. दसकगाव, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या ४ जानेवारी रोजी त्यांना सायबर भामट्याने डिस्ने-हॉटस्टार या ॲपचे सबक्रिशन अपग्रेड करण्यासाठी चटर्जी यांना मोबाईलवर संपर्क साधला होता.
यावेळी संशयितांने महिलेस ऐनीडेस्क ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर संशयिताने त्यांच्या मोबाईलचा अक्सेस घेत त्यांच्या बँकेचे तपशिल घेतले आणि नेट बँकिंगद्वारे आयएमपीसी व एनईएफटीद्वारे १० लाख ५० हजार रुपये डेबिट करून घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली.
सदरचा प्रकार ४ व ५ जानेवारी दरम्यान घडला. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख हे करीत आहेत.