नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नातेसंबंधातील ओळखीचा गैरफायदा घेत एका २५ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून फिरण्याच्या बहाण्याने घोटी, इगतपुरी या भागात घेऊन जात रिसॉर्टमध्ये बळजबरीने दारू पाजत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात एका ३२ वर्षीय संशयित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पीडित युवती व संशयित आरोपी हे एकमेकांचे जवळचे नातलग आहेत. पीडिता ही इंजिनिअर असून, तिला संशयित युवकाने मैत्री करत प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून जुलै २०२२ मध्ये घोटी, इगतपुरी परिसरात फिरण्यासाठी घेऊन जाण्याचा बनाव केला. तेथे एका रिसॉर्टवर व त्यानंतर मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित हॉटेलमध्ये घेऊन जात वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत पीडितेने म्हटले आहे.
दरम्यान, संशयिताने अश्लील व्हिडीओ, फोटो शूटिंग करून त्याआधारे पीडितेला वारंवार धमकावत बलात्कार केला. यानंतर घरी जात नातेवाईकांना शिवीगाळ व मारहाण केल्याने अखेर पीडितेने त्याच्या वाढत्या छळाला कंटाळून मुंबईनाका पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.