नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात आठवडाभरात शहरातील तीन लाख ५३ हजार ९७८ कुटुंबांचे ‘इम्पेरिकल डेटा’ सर्वेक्षण झाले असून आता येत्या दोन दिवसांत दीड लाख कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे आव्हान प्रगणक, पर्यवेक्षक व प्रभाग अधिकाऱ्यांवर आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची जरी सांगता झाली असली तरी जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेली शहरी भागात महापालिकेवर इम्पेरिकलडेटा संकलित करण्याची मोहीम सुरूआहे. त्यासाठी पालिकेचे २५९९कर्मचारी प्रगणक काम करीत आहे. महापालिका हद्दीतील जवळपास पाचलाख १३ हजार मिळकती असून, या प्रत्येक घरात जाऊन हे सर्वेक्षण होत आहे.
गेल्या आठवड्यापासून हे सर्वेक्षण सुरूझाले असून सोमवारी (दि. २९)सायंकाळपर्यंत शहरातील तीन लाख ५३हजार ९७८ कुटुंबांचे सर्वेक्षण झाले आहे.सर्वेक्षणाचे शेवटचे दोन दिवस शिल्लक असून या दोन दिवसांत सुमारे दीड लाख कुटुंबांचे सर्वेक्षण कसे होणार अशी चिंता आता पालिकेचे कर्मचारी वअधिकारीच व्यक्त करत आहेत.
महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या यासर्वेक्षणात विविध तांत्रिक अडचणी येत असताना आता उच्चभ्रू वस्त्यांमध्येप्रगणकांना प्रवेशही मिळत नसल्याचीबाब डोकेदुखी ठरत आहे. कर्मचाऱ्यांना संबंधितांकडून प्रश्नांचीउत्तरे देण्यास टाळाटाळ केली जातआहे. यामुळे नवीनच समस्या याकर्मचाऱ्यांपुढे उभी राहिली आहे.
विभाग सर्वेक्षण झालेली कुटुंबे
सातपूर: ५३,०२९, नाशिक पश्चिम: ३३,५००, नाशिक पूर्व: ६९,४४९, पंचवटी: ७०,०००, नाशिकरोड: ५०,४००.