नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): बाबाज थिएटर्सतर्फे गुरुवारी (दि.१) गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृहात ‘सांभाळून धंदापाणी जपूया स्वरांचे मणी’ सुमधुर हिंदी क्लासिक गाण्यांच्या कार्यक्रमासह कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी सहाला होणार असून विविध गायकांची गाणी ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. सागर काकतकर, दीपक चौधरी, उदय जोशी, रिया बागुल, सुरभी गौड, डॉ. क्षमा अघोर या गायकांचा समावेश आहे. जयेश भालेराव, डॅनियल म्हस्के यांची वाद्य साथसंगत लाभणार आहे. अमोल पाळेकर यांनी वाद्यवृंदाचे संयोजन केले आहे. सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार कृतज्ञता सोहळ्यात केला जाणार आहे. गौरव तांबे तबलावादक (सांस्कृतिक), प्रा. सुनील हिंगणे (सामाजिक/ सांस्कृतिक), ऋषीकेश शेलार (सुप्रसिद्ध गायक व संगीतकार) यांचा समावेश आहे. सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक, अभिनेता, रंगकर्मी सचिन शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. उपस्थितीचे आवाहन प्रशांत जुन्नरे, कैलास पाटील, प्रा. डॉ. प्रितीश कुलकर्णी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.