उद्यम कौस्तुभ व जीवन गौरव पुरस्कारार्थींची घोषणा.
नाशिक – ब्राह्मण व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संस्था ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल ( बीबीएनजी ) तर्फे 8 वी आंतरराष्ट्रीय परिषद परिवर्तन ४ फेब्रुवारी २०२४ रोजी नाशिक येथील गुरुदक्षिणा हॉल येथे होणार असून या परिषदेसाठी जगभरातील नामवंत ब्राह्मण उद्योजक व वक्ते येणार असल्याची माहिती बीबीएनजी चे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी दिली .
या नामवंत वक्त्यांमध्ये गीतांजली किर्लोस्कर (चेअरपर्सन & एम.डी. – किर्लोस्कर सिस्टीम(प्रा) लि.) , रवींद्र साठे ( चेअरमन –महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळ) सुनील देवधर ( जेष्ठ नेते –भारतीय जनता पार्टी,) डॉ.अशोक जोशी (संस्थापक ,मायक्रोलीन एलएलसी,साल्ट लेक सिटी,अमेरिका) ,योगेंद्र पुराणिक( गॅझेटेड नागरी सेवा अधिकारी,माजी आमदार,जपान) ,उदय निरगुडकर( संचालक NHPC), आनंद गानू ( अध्यक्ष,गर्जे मराठी ग्लोबल एल एल सी, अमेरिका), गिरीश चितळे (संचालक चितळे डेअरी), डॉ.संजय पैठणकर- दुबई, डॉ.विजय जोशी ( D R S कन्सल्टिंग ,सिडनी, ऑस्ट्रेलिया), संजय लोंढे ( अशोक बिल्डकॉन ) , विश्वास पाठक (संचालक महावितरण ) विवेक देशपांडे ( रुद्रानी इन्फ्रास्ट्रक्चर ) ,सुमित तिवारी ( टायमस) ,शरयू देशमुख ( डेल्टा फिनाकेम), अनिल जोशी ( जैन इरिगेशन) ,विष्णू मनोहर ( सुप्रसिद्ध शेफ ), मंगेश गोंदवले- (व्यवस्थापकीय संचालक, MAIDC ), अतुल कुर्लेकर –(संचालक, लोड स्टार कम्युनिकेशन्स ) ,अभिजित जोग –( सीएमडी,प्रतिसाद अॅडव्हरटायझिंग, ) ही प्रमुख आहेत .हे वक्ते उद्योगाशी संबंधित अश्या विविध पैलूंवर संवाद साधतील
या शिवाय दरवर्षी बीबीएनजी तर्फे उद्योगांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांचा गौरव करण्यात येतो . या वर्षी खालील उद्योजकांना गौरवण्यात येणार आहे.
जीवन गौरव पुरस्कार:
1)सीमा किणीकर (सोलापूर), 2) डॉ.रघुनाथ शुक्ला (शास्त्रज्ञ, एन सी एल ,पुणे)
उद्यम कौस्तुभ पुरस्कार :
1)कुमार काळे- (नागपूर) 2)आर्की.प्रज्ञा पोंक्षे- (मुंबई), 3)रवळनाथ शेंडे- (कराड) 4)गोविंद झा – (नाशिक )
5)डॉ.रणजीत जोशी –(विम्बल्डन,लंडन व नाशिक) 6)डॉ.संजय पैठणकर-(दुबई)
उद्योजकांचे देशाच्या विकासात मोलाचे योगदान असून देशाचे अर्थकारण व रोजगार निर्मिती मध्ये देखील उद्योजकांची महत्वाची भूमिका असते . या परिषदेचा उद्देश व्यवसायाच्या वाढीसाठी विचारमंथन तसेच उद्योजकता विकास असून
विविध उद्योजकांना भेटण्याच्या आणि नेटवर्कच्या संधींद्वारे व्यवसाय वृद्धी च्या संधी मिळवणे असा आहे. परिषदेमध्ये नवनवीन उत्पादनांचे लाँचिंग व उद्योजकीय कौशल्यांचे प्रदर्शन देखील होणार आहे. अधिक माहिती साठी 9822753226 येथे संपर्क साधावा असे आवाहन परिवर्तन परिषदेचे प्रमुख डॉ.अभिजीत चांदे यांनी केले आहे.