नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे शनिवारी (दि. २७) आणि रविवारी (दि. २८) ख्याल संकीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. एकूण तीन सत्रांत होणाऱ्या या कार्यक्रमात रागदारी संगीत गायन व वादन होणार आहे. एकूण ३० कलावंत यात सहभागी होणार आहेत.
शनिवारी सायंकाळी ६ वा. होणाऱ्या प्रथम सत्रात ईश्वरी आणि सूरश्री दसककर (गायन), उद्धव आष्टूरकर (सतारवादन), यश मालपाठक, मल्हार चिटणीस, सारंग तत्त्ववादी, आशुतोष इप्पर (तबला सहवादन), सुखदा बेहेरे दीक्षित (गायन), सागर कुलकर्णी (गायन) हे सहभागी होतील. रविवारी (दि. २८) सकाळी १० वाजेपासूनच्या सत्रात प्रीतम नाकील (गायन), मानस गोसावी (मोहनवीणा वादन), सचिन चंद्रात्रे (गायन), आनंद अत्रे (गायन) या कलावंतांचे सादरीकरण होईल.
सायंकाळच्या ५.३० वाजेपासूनच्या सत्रात केतन इनामदार (गायन), आशिष रानडे (गायन), अद्वय पवार-कुणाल काळे (तबला सहवादन), मकरंद हिंगणे (गायन), अविराज तायडे (गायन) यांचे सादरीकरण होईल. उपस्थित रहावे, असे आवाहन कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.