नाशिक: अंबड परिसरात एमडी ड्रग्ज डिलरसह पेडलर्स जेरबंद! 27.5 ग्रॅम एमडी जप्त

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्जच्या कारखान्यांपाठोपाठ अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रींमुळे शहर राज्यात चर्चेत आलेले असताना अजूनही नवनवीन एमडी ड्रग्जचे डिलर अन्‌ पेडलर्स पोलिसांच्या हाती लागत आहेत.

चुंचाळे पोलीस चौकीच्या पथकाने अंबड परिसरात एमडी विक्री करण्यासाठी आलेल्या मुंबईच्या डिलरसह शहरातील पेडसर्लला शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे तीन लाखांचे २७.५ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांच्या या कारवाईमुळे एमडीचे जाळे शहरभर पसरले आहे की काय, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.

मुश्ताक शौकत अली शेख उर्फ भुऱ्या (३०, रा. अभियंतानगर, पदमा हॉटेलच्या पाठीमागे, कामटवाडे, सिडको, नाशिक) असे एमडी ड्रग्ज खरेदी करणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

हे ही वाचा:  नाशिक:  'स्टॉप-सर्च' कारवाईत यश: दुचाकी चोरणारा सराईत पोलिसांच्या तावडीत !

तर, ठाण्यातील मुंब्रा येथून ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या मोहम्मद शोएब शकील शेख (२०, रा. गोवंडी ईस्ट डंपिंग रोड, डॉ. झाकिर हुसैननगर, मुंबई. मुळ रा. गुडसायगंज, जि. कन्नोज, उत्तर प्रदेश), रिजवान खुर्शिद खान (३३, रा. गोवंडी रिंग रोड, डॉ. झाकीर हुसैननगर, गोवंडी पूर्व), शफीगफूर रहमान मन्सुरी (३१, रा. गोवंडी रिंग रोड, गोवंडी पूर्व), मेराज सज्जाद कुरेशी (२८, रा. गोवंडी रिंग रोड, गोवंडी पूर्व) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: नाशिक: शहरातील या महत्वाच्या भागांत आज वाहतुकीस 'नो एंट्री' !

अंबडजवळील एक्सलो पॉईंटजवळ मुंब्रा येथून काही संशयित अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय खबर अंबड पोलीस ठाण्याच्या चुंचाळे एमआयडीसी पोलीस चौकीचे अंमलदार अनिल कुऱ्हाडे यांना मिळाली होती.

परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चुंचाळे पोलीस चौकीचे पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. २४) सापळा रचण्यात आला.

त्यावेळी संशयित रिक्षाचालक भुऱ्या हा मुंबईवरून आलेल्या संशयितांना पैसे देऊन त्यांच्याकडून पाकिटातून एमडी ड्रग्ज खरेदी करताना आढळून आला. त्याचवेळी दबा धरून असलेल्या पोलिस पथकाने सर्व संशयितांना चौहीकडून घेऊन ताब्यात घेतले.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून लिंक पाठवत ३९ लाखांना गंडा

संशयितांकडून २७. ५ ग्रॅम एमडी ड्रग्ज, चार मोबाईल, ३४ हजार रुपये, दुचाकी (एमएच ०४ एलयू ३४६४), रिक्षा (एमएच ०३ डी. एस. ४३८९) असा ३ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, सहायक निरीक्षक गणेश मुगले, उपनिरीक्षक संदीप पवार, समाधान चव्हाण, जाधव, कांदळकर, नेहे, कुर्हाडे, जनार्दन ढाकणे, विराजदार खैरनार, सोनवणे, महिला पोलीस खर्डे, भालेराव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790