नाशिक: शहरात दुचाकी चोऱ्या थांबेनात; पुन्हा 5 दुचाकींची चोरी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): शहर हद्दीमध्ये दुचाकी चोरीच्या घटनांना अद्यापही आळा बसू शकलेला नाही. शहरातील विविध भागातून पुन्हा पाच दुचाकी चोरीला गेल्या आहेत.

याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अक्रम इसाक शेख (रा. द्वारकानगरी, वडाळारोड) यांची १५ हजारांची स्प्लेंडर दुचाकी (एमएच १५ डीएच ४२२४) गेल्या १२ तारखेला गाडगे महाराज पुतळ्यापासून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंत झाले 'इतके' टक्के मतदान…

अनुप जयप्रकाश लुनावत (रा. द्वारका, नाशिक) यांची १५ हजारांची दुचाकी (एमएच १५ एफडब्ल्यु ९९३७) गेल्या १५ नोव्हेंबर रोजी श्री हरी कुटे मार्गावरील बिजनेस बे च्या पार्किंगमधून चोरीला गेली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: वेब कास्टिंग कक्षाद्वारे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे निरीक्षण

निलेश मुरलीधर जगताप (रा. श्रमिकनगर, सातपूर) यांची १० हजारांची दुचाकी (एमएच १५ सीबी ८०३६) गेल्या बुधवारी (ता. १७) श्रमिकनगरमधील माळी कॉलनीतून चोरीला गेली. याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पार्थ शंतनू सोनवणे (रा. चैत्रनिर्मल अपार्टमेंट, इंदिरानगर) यांची २० हजारांची दुचाकी (एमएच १५ सीएफ ५२६८) गेल्या १२ तारखेला मध्यरात्री त्यांच्या राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून चोरीला गेली.

हे ही वाचा:  नाशिक: एसटी व ट्रकचा अपघात; दोन्ही चालक ठार; २ जण गंभीर जखमी

याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिदधार्थ भीमराव पगारे (रा. हरित संस्कृती अपार्टमेंट, खर्जुळमळा, नाशिकरोड) यांची २५ हजारांची शाईन दुचाकी (एमएच १५ एफबी ९७१८) गेल्या ५ तारखेला मध्यरात्री राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून चोरीला गेली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790