नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सीतागुंफा मंदिराच्या शेजारी असलेल्या गोरेराम मंदिर जीर्णोद्धार कामासाठी मदत करण्याचा बहाणा करत मंदिराच्या साधुमहंतांकडून वेळोवेळी रोख व ऑनलाइन पध्दतीने रक्कम घेत बनावट करारनामा करून खोटी स्वाक्षरी घेत सुमारे ४० लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी तिघा जणांवर पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपींत स्वामिनारायण मंदिरजवळ राहणाऱ्या एका महिलेसह सातपूर येथील दोघांचा समावेश आहे. या फसवणुकीबाबत गोरेराम मंदिराचे महंत राजाराम दास गुरू श्री षालीग्रामदास वैष्णव (४३) यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून राजू अण्णा चौघुले, रोहन राजू चौघुले दोघे रा. चौघुले निवास अशोकनगर, सातपूर तसेच स्वामिनारायण मंदिर समीर अपार्टमेंट येथे राहणाऱ्या श्रीमती भारती युवराज शर्मा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
ऑगस्ट २०२१ ते (दि.१६) जानेवारी २०२४ या कालावधीत संशयित आरोपी चौघुले व शर्मा यांनी मंदिर जीर्णोद्वार कामासाठी मदतीचा बहाणा करून महंत राजाराम दास यांचा विश्वास संपादन करत वेळोवेळी त्यांच्याकडून रोख व ऑनलाइन पद्धतीने सुमारे ४० लाख रुपयांची रोकड स्वीकारली, त्यानंतर बनावट करारनामा करत महंत राजाराम दास यांची खोटी स्वाक्षरी करत रक्कम देण्यास टाळाटाळ केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक २७/२०२४)
![]()


