नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): लघु उद्योग भारती नाशिक शाखेतर्फे दरवर्षी “इंजिनीयरिंग टॅलेंट सर्च” अशा उपक्रमाचे आयोजन केले जाते. ह्या स्पर्धेमागील मुख्य उद्देश प्रस्थापित अभियंत्यांच्या औद्योगिक व सामाजीक क्षेत्रातील लक्षणीय योगदानाचे मूल्यमापन करणे, कौशल्य गुणांचे कौतुक करणे, आणि त्यांना अधिक उद्यमशील होण्यास प्रोत्साहन देणे इ. आहेत.
ह्या वर्षापासुन शैक्षणिक क्षेत्रातील अभियंत्यांनाही ह्या स्पर्धेत सहभागी करून घेतले आहे. उदयोन्मुख अभियंत्यांचा औद्योगिक क्षेत्रात प्रवेश व उद्योजकांना उदयोन्मुख अभियंत्यांकडून असणा-या अपेक्षा यांच्यामधील दरी कमी करणे हाही ह्या उपक्रमामागील मागील उद्देश आहे. या उपक्रमाचे हे तृतीय वर्ष आहे.
नाशिकमधील औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रातील गुणवान इंजीनियर्सना एक समान व्यासपीठ उपलब्ध करून देऊन ह्या वर्षी ही स्पर्धा पार पडली. ह्या उपक्रमा अंतर्गत औद्योगिक क्षेत्रातून २०० तर शैक्षणिक क्षेत्रातून ३०० अभियंत्यांनी भाग घेतला. लघु उद्योग भारती नाशिक शाखेच्या तज्ञ समितीच्या देखरेखित ह्या प्रवेशिकांतून औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रातून प्रत्येकी २० उत्तम स्पर्धक निवडले गेले. ह्या स्पर्धकांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन व त्यांनी सादर केलेले उपक्रम तपासून त्यातील औद्योगिक क्षेत्रातील तीन व शैक्षणिक क्षेत्रातील तीन सर्वोत्तम स्पर्धकांची घोषणा या कार्यक्रमात होणार आहे.
ह्या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यास रोख रक्कम, ट्रॉफी, सर्टिफिकेट देऊन सत्कार होणार आहे. तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे ही दिली जातील.
गुणवान इंजीनियर्सचा यथोचित सन्मान करण्यासाठी लघु उद्योग भारती नाशिक शाखेतर्फे सदर कार्यक्रम डॉ विनोद मोहितकर (संचालक, तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य), संदीप कर्णिक (पोलीस आयुक्त, नाशिक), मारुती मद्देवाड (अॅडिशनल डायरेक्टर, इन्व्हेस्टिगेशन, प्राप्तीकर विभाग), विलास शिंदे (अध्यक्ष, सह्याद्री फार्म, दिंडोरी, नाशिक.), डॉ. गोरक्ष गर्जे (सह संचालक उच्च तंत्रशिक्षण व प्राचार्य शासकीय तंत्रशिक्षण नाशिक) ह्या मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे.
ह्या कार्यक्रमास नावाजलेले उद्योजक, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, अभियंते, अनेक औद्योगिक सघटनांचे पदाधिकारी इ. उपस्थितीत राहणार आहेत. तरी ह्या कार्यक्रमास विविध क्षेत्रातिल मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन लघु उद्योग भारती नाशिक शाखेतर्फे करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी यांना संपर्क करावा;
निखिल तापडिया: ९७६३७१०३७७, श्री योगेश जोशी: ९८९००४०२७४
कार्यक्रमाची तारीख व वेळ: बुधवार दि. १७ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ४:०० ते सायं. ७:००
कार्यक्रमाचे ठिकाण: हॉटेल एक्सप्रेस इन, मुंबई – आग्रा रोड, एमआयडीसी, अंबड, नाशिक