31 जानेवारी आधी करा ‘हे’ काम, नाहीतर फास्टॅग वापरता येणार नाही; वाचा सविस्तर

मुंबई (प्रतिनिधी): जर तुम्ही गाडी चालवत असाल आणि फास्टॅग (FASTag) वापरत  असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. फास्टॅग वापरायचं असेल तर तुम्हाला 31 जानेवारी आधी एक महत्त्वाचं काम पूर्ण करावं लागणार आहे, नाहीतर तुम्हाला फास्टॅग वापरता येणार नाही.

फास्टॅग संदर्भात नवीन अपडेट जारी करण्यात आलं आहे. फास्टॅग वापरायचं असेल तर 31 जानेवारी आधी केवायसी (KYC) करुन घ्या नाहीतर, फास्टॅग वापरता येणार नाही.

KYC न केल्यास फास्टॅग होईल बंद:
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक अपडेट जारी केला आहे. 31 जानेवारीनंतर केवायसी (KYC – Know your Customer) ने केलेले किंवा अपूर्ण केवायसी झालेले फास्टॅग बंद करण्यात येतील. NHAI कडून जारी करण्यात आलेल्या नव्या अपडेटनुसार, 31 जानेवारी पूर्वी फास्टॅगचे केवायसी (KYC) करणे आवश्यक आहे, अशी घोषणा NHAI ने केली आहे.

केवायसी (KYC) न केल्यास 31 जानेवारीनंतर तुमचा फास्टॅग बंद होईल. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना तुम्हाला टोल भरण्यात अडचण येईल आणि प्रवास करतानाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे 31 जानेवारी पूर्वी फास्टॅग केवायसी करून घ्या.

नाहीतर 31 जानेवारीनंतर FASTag बंद होईल… :
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, 31 जानेवारी पर्यंत फास्टॅग केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलं आहे. जर तुम्ही तुमच्या कारच्या फास्टॅगचे केवायसी बँकेकडून अपडेट केले नसेल, तर ते 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करून घ्या. कारण, बँका KYC शिवाय फास्टॅग निष्क्रिय किंवा ब्लॅकलिस्ट करण्यात येतील. यानंतर फास्टॅगमध्ये शिल्लक असूनही पेमेंट होणार नाही.

फास्टॅग सुविधा अधिक सुरळीत होणार:
31 जानेवारीपर्यंत फास्टॅगचे केवायसी अपडेट न केल्यास ते ब्लॉक केलं जाईल. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने 15 जानेवारीला नवी अधिसूचना जारी केली आहे. NHAI ने फास्टॅग ग्राहकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या नियमांनुसार फास्टॅगसाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलं आहे. यामुळे फास्टॅग सुविधा अधिक सुरळीत होईल, असंही सांगितलं आहे.

‘हे’ फास्टॅग हटवावे लागणार:
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) सांगितलं आहे की, कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी नवीन फास्टॅगचे केवायसी पूर्ण असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. यासोबतच ‘वन व्हेईकल, वन फास्टॅग’ फॉलो करावे लागेल आणि त्यापूर्वी जारी केलेले सर्व फास्टॅग हटवावे लागतील.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790