नाशिक: ग्रामीणसह शहर पोलीस दलात खांदेपालट, ‘इतक्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासह ग्रामीण पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिक शहरात एकूण 53 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही खांदेपालट करण्यात आली आहे. 

एकीकडे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरून राजकीय पक्षांमध्ये तिढा निर्माण होऊ शकतो. राजकीय पक्षांमध्ये आपल्या मित्र पक्षांसोबत जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु आहे. लवकरच लोकसभेची आचारसंहिता लागू शकते, अशी देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

तर दुसरीकडे पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार निवडणुकांच्या आधी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अध्यादेशातील तरतुदीनुसार यांनी दोन सहाय्यक पोलीस आयुक्त, 25 पोलीस निरीक्षक आणि 26 सहाय्यक पोलीस निरीक्षक अशा 53 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहे. तसेच ग्रामीण पोलीस दलातील 22 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.  

सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या पुढीलप्रमाणे

  • शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांची नाशिकरोड विभागात बदली,
  • अंबादास भुसारे यांची सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन म्हणून बदली. 
⚡ हे ही वाचा:  त्रिभाषा धोरण निश्चिती समिती मंगळवारी (दि. ११) नाशिक जिल्हा दौऱ्यावर

पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पुढीलप्रमाणे

  • नाशिक शहर वाहतूक शाखेचे सोहन माछरे यांची पंचवटी पोलीस ठाण्यात प्रभारी म्हणून बदली, 
  • पंचवटी पोलीस ठाण्याचे जितेंद्र सपकाळे यांची उपनगर पोलीस ठाणे,
  • शहर गुन्हे शाखेचे रणजीत नलवडे यांची सातपूर पोलीस ठाणे,
  • आर्थिक गुन्हे शाखेचे अशोक शरमाळे यांची इंदिरानगर पोलीस ठाणे,
  • पंचवटी पोलीस ठाण्याचे अनिल शिंदे यांची गुन्हे शाखा युनिट 2, 
  • इंदिरानगर पोलीस ठाण्याचे नितीन पगार यांची आर्थिक गुन्हे शाखा,
  • सातपूर पोलीस ठाण्याचे पंकज भालेराव यांची आर्थिक गुन्हे शाखा, 
  • गंगापूर पोलीस ठाण्याचे श्रीकांत निंबाळकर यांची विशेष शाखा, 
  • देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रवीण चव्हाण यांची आडगाव पोलीस ठाणे, 
  • सरकारवाडा पोलीस ठाण्याचे दिलीप ठाकूर यांची अंबड पोलीस ठाणे, 
  • भद्रकाली पोलीस ठाण्याच्या तृप्ती सोनवणे यांची गंगापूर पोलीस ठाणे,
  • आडगाव पोलीस ठाण्याचे गणेश न्याहदे यांची विशेष शाखा, 
  • वाहतूक शाखेचे सुभाष ढवळे यांची म्हसरूळ पोलीस ठाणे,  
  • आर्थिक गुन्हा शाखेचे सुरेश आव्हाड यांची सरकारवाडा पोलीस ठाणे,
  • अंबड पोलीस ठाण्याचे प्रमोद वाघ यांची आर्थिक गुन्हे शाखा,  
  • विशेष शाखेच्या सुरेखा पाटील यांची सरकारवाडा पोलीस ठाणे, 
  • आर्थिक गुन्हे शाखेचे संजय पिसे यांची भद्रकाली पोलीस ठाणे, 
  • शहर वाहतूक शाखेचे राकेश हांडे यांची शहर वाहतूक शाखा युनिट 1. 
  • नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पवन चौधरी यांची शहर वाहतूक शाखा युनिट 2.
  • अंमली विरोधी पथकाचे दिवाण वसावे यांची शहर वाहतूक शाखा युनिट 2. 
  • विशेष शाखेचे महेंद्र चव्हाण यांची बीडीडीएस, 
  • महिला सुरक्षा विभागाच्या ज्योती आमणे यांची पंचवटी पोलीस ठाणे, 
  • वाचक शाखेचे प्रकाश पवार यांची नियंत्रण कक्ष, 
  • पीसीबी-एमओबीचे धर्मराज बांगर यांची वाचक शाखा.
  • खंडणी विरोधी पथकाचे विद्यासागर श्रीमणवार यांची देवळाली कॅम्प पोलीस ठाणे
⚡ हे ही वाचा:  कुंभमेळ्यात नाशिकसह महाराष्ट्राचे ब्रॅण्डिंग करण्याची मोठी संधी-मुख्य सचिव राजेशकुमार

सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पुढीलप्रमाणे

  • पंचवटी पोलीस ठाण्याचे दिनेश खैरनार यांची शहर वाहतूक शाखा,
  • भद्रकाली पोलीस ठाण्याचे संजय बिडगर यांची पोलीस कल्याण / प्रशिक्षण शाखा,
  • सरकारवाडा पोलीस ठाण्याचे विष्णू भोये यांची नियंत्रण कक्ष, 
  • अंबड पोलीस ठाण्याचे साजिद मन्सुरी यांची गुन्हे शाखा,
  • अंबड पोलीस ठाण्याच्या प्रमिला कावळे यांची गुन्हे शाखा, 
  • नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अनिल जगताप यांची शहर वाहतूक शाखा,
  • अंबड पोलीस ठाण्याचे वसंत खतेले यांची गुन्हे शाखा, 
  • इंदिरानगर पोलीस ठाण्याचे शंकरसिंग राजपूत यांची गुन्हे शाखा, 
  • आडगाव पोलीस ठाण्याचे संतोष शिंदे यांची विशेष शाखा,  
  • म्हसरूळ पोलीस ठाण्याचे विनायक आहिरे यांची आर्थिक गुन्हे शाखा, 
  • भद्रकाली पोलीस ठाण्याचे किशोर खांडवी यांची शहर वाहतूक शाखा,   
  • देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रकाश गिते यांची नियंत्रण कक्ष,
  • भद्रकाली पोलीस ठाण्याचे शिवाजी अहिरे यांची देवळाली कॅम्प पोलीस ठाणे,   
  • गंगापूर पोलीस ठाण्याचे नितीन पवार यांची मुंबई नाका पोलीस ठाणे, 
  • नाशिकरोड पोलीस ठाण्याचे हेमंत फड यांची गुन्हे शाखा, 
  • पंचवटी पोलीस ठाण्याच्या सुवर्णा हांडोरे यांची सायबर पोलीस ठाणे, 
  • भद्रकाली पोलीस ठाण्याच्या छाया देवरे यांची आर्थिक गुन्हे शाखा, 
  • इंदिरानगर पोलीस ठाण्याचे निखिल बोंडे यांची आडगाव पोलीस ठाणे,
  • म्हसरूळ पोलीस ठाण्याचे सुधीर पाटील यांची मुंबई नाका पोलीस ठाणे, 
  • गंगापूर पोलीस ठाण्याचे नरेंद्र बैसाणेयांची उपनगर पोलीस ठाणे,
  • मुंबई नाका पोलीस ठाण्याचे सोमनाथ गेंगजे यांची गंगापूर पोलीस ठाणे, 
  • गुन्हे शाखेचे किरण रौंदळ यांची अंबड पोलीस ठाणे, 
  • गुन्हे शाखेचे प्रवीण सूर्यवंशी यांची नाशिकरोड पोलीस ठाणे, 
  • आर्थिक गुन्हे शाखेच्या उमा गवळी यांची भद्रकाली पोलीस ठाणे, 
  • शहर वाहतूक शाखेचे पतीन पाटील यांची अंबड पोलीस ठाणे, 
  • आर्थिक गुन्हे शाखेचे किशोर कोल्हे यांची पंचवटी पोलीस ठाणे.
⚡ हे ही वाचा:  नाशिक: दिडशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

here