नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकला यवतमाळ जिल्हयातील शाळेचे सहलीसाठी आलेल्या शिक्षक व विदयार्थी यांचे १८ मोबाईल चोरणा-या चोराला पोलिसांनी गजाआड केले आहे. भद्रकाली पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाने ही कामगिरी केली आहे.
या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, २६ डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील नारायण लिला, इंग्लिश मीडियम या शाळेची शिक्षक व विदयार्थी असे ९४ जण हे सहलीकरीता नाशिक शहरात आले होते. नाशिक शहरातील देवदेवतांचे दर्शन घेतल्या नंतर सहलीतील सर्व विदयार्थी व शिक्षक हे गोदाघाटा येथील संत गाडगे महाराज धर्मशाळा, नाशिक येथे मुक्कामाकरीता थांबले होते.
सर्व विद्यार्थी व शिक्षक हे धर्मशाळेतील हॉल मध्ये त्यांचे कडील मोबाईल चार्जिंगला लावून झोपले. त्यानंतर धर्मशाळेच्या उघडया शटर मधून अज्ञात चोरटया इसमाने प्रवेश करून चार्जिंगला लावलेले व विदयार्थी यांनी उशाशी ठेवलेले एकुण २० मोबाईल हॅन्डसेट किंमत १ लाख ६० हजार चोरून नेले. या चोरी प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर या गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध सुरु झाला. अगोदर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटिल, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती तृप्ती सोनावणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि सत्यवान पवार व अंमलदार यांनी भद्रकाली पोलीस ठाणेचे अभिलेखावरील वरील नमुद दाखल गुन्हा व मालमत्ते विरूध्दचे इतर गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने योजना आखली.
त्यात भद्रकाली गुन्हे शोध पथकाचे अंमलदार सागर निकुंभ सदर गुन्हयातील अज्ञात चोरटा हा व्दारका सर्कल या ठिकाणी संशयित रित्या फिरत असल्याची मिहिती मिळाली. गुन्हे शोध पथकाने लागलीच त्यास ताब्यात घेतले. हा चोर मालेगाव येथील असून त्याचे नाव शफिक तौफिक शेख, ३६ वर्षे, रा- गल्ली नं ०१, लोमाणी नगर, मालेगाव असे आहे. त्याच्याकडून गुन्हयातील विविध कंपन्याचे मिळुन एकुण १ लाख ५० हजार रूपये किंमतीचे १८ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.