नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सीबीएस बसस्थानकात बसमध्ये चढण्याच्या वादातून एकाने सासरा जावयावर हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत काही तरी धारदार वस्तूने वार करण्यात आल्याने सासरा जावई जखमी झाले असून याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तौसिफ खलील शेख (३५ रा.अल्मदिना कॉलनी,जेएमसीटी कॉलेजजवळ) असे सासरा जावयावर हल्ला करणा-या संशयिताचे नाव आहे. याबाबत नितीन विश्वास खैरनार (रा. खुटवडनगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. खैरणार रविवारी (दि.१४) सासरे राजाराम भामरे (६४) यांना सोडण्यासाठी सीबीएस बसस्थानकात गेले होते. बसमध्ये सास-यांना जागा मिळवून देण्यासाठी गर्दीतून ते चढत असतांना ही घटना घडली.
संशयिताने गर्दीत सासरा-जावयास बसमध्ये चढण्यास विरोध केला. त्यामुळे तिघांमध्ये वाद झाला. यावेळी झालेल्या शाब्दीक चकमकी प्रसंगी संशयिताने दोघांना शिवीगाळ करीत थेट मारहाण केली. जावई व सास-याने त्यास प्रतिकार केला असता संशयिताने काही तरी धारदार शस्त्राने दोघांवर वार केला. या घटनेत सासरा व जावई जखमी झाले असून अधिक तपास पोलिस नाईक लोंढे करीत आहेत.