नाशिक: पार्सल पॉईंट येथे गॅस स्फोटात भाजलेल्या ‘त्या’ दोघांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): येथील कलानगर सिग्नलजवळ मैत्र विहार अपार्टमेंटच्या एका गाळ्यामध्ये वक्रतुंड पार्सल पॉईंट नावाचे दुकान आहे. या दुकानात सोमवारी (दि. १) गॅसगळती होऊन झालेल्या स्फोटात गंभीररीत्या भाजलेल्या दोघा इसमांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: डा‍क विभागाची 2 फेब्रुवारीला पेन्शन अदालत; निवृत्तीवेतनधारकांनी 28 जानेवारीपर्यंत करावेत अर्ज

याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे. कलानगर सिग्नलजवळ असलेल्या वक्रतुंड पार्सल पॉइंटमध्ये स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून मध्यरात्रीनंतर गळती झाली. गाळ्यात गॅस साठवून राहिलेला असताना सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास दुकानात स्फोट झाला होता.

या वेळी दुकानमालक सुरेश नारायण लहामगे (५५, रा. वंदना पार्क, इंदिरानगर) व त्यांच्यासोबत असलेला रिक्षाचालक संदीप सखाराम कालेकर (३१, रा. शांतीनगर, मखमलाबाद) हे दोघेही भाजले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आज भारतीय सेनेच्या आधुनिक शस्त्रसामग्रीसह आपत्ती प्रतिसाद दल उपकरणांचे प्रदर्शन

त्यांना उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी (दि.४) सकाळी लहामगे व कालेकर या दोघांना वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790