नाशिक: आता सिटीलिंकचा डुप्लिकेट पास ठेवाल तर होणार दंडात्मक कारवाई !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): डुप्लिकेट पास बाळगून सिटीलिंकमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय सिटीलिंक व्यवस्थापनाने घेतला आहे. महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या वतीने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता सवलतीच्या दरात विविध प्रकारच्या पासेसचे वितरण करण्यात येते.

सद्यस्थितीत नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता सिटीलिंकच्या वतीने विद्यार्थी पास, विशिष्ट मार्ग पास, ओपन एंडेड पास, दिव्यांग मोफत पास देण्यात येतात. सिटीलिंकने साध्या पास ऐवजी आता प्रवाशांना आरएफआयडी पास देण्यास सुरुवात केली आहे. तसेच, दि. १ जानेवारी २०२४ पासून सदर आरएफआयडी पास हे अनिवार्य करण्यात आलेले आहे. आरएफआयडी म्हणजेच रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. नवीन

⚡ हे ही वाचा:  नाशिककरांनो लक्ष द्या ! शहरातील 'या' वाहतूक मार्गांत अतिशय महत्वाचे बदल !

पासमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप असल्याने सदर प्रवाशाची सिटीलिंक संदर्भात, तसेच ज्या बसमधून प्रवासी प्रवास करीत आहे त्या बसमध्ये पास स्कॅन झाल्याने सदर वाहकाने बस फेरी दरम्यान केलेल्या कामकाजाची इत्थंभूत माहिती मिळते. त्यामुळे कोणतेही आर्थिक अपहार टाळण्याच्या दृष्टीने हे कार्ड महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

⚡ हे ही वाचा:  पोलिसांच्या समर्थनार्थ लावलेली होर्डिंग्ज काढावीत – नाशिक शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

परंतु सद्य:स्थितीत काही प्रवासी डुप्लिकेट आरएफआयडी पास बनवून प्रवास करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, डुप्लिकेट पासमध्ये विशिष्ट इलेक्ट्रॉनिक चिप नसल्याने असे पास स्कॅन होत नाही.

परंतु अशाप्रकारे डुप्लिकेट पास बाळगून प्रवास करणारे प्रवासी आढळून आल्यास सदर प्रवासी विनातिकीट प्रवासी समजून अशा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. प्रवाशांनी विनातिकीट दंडात्मक कारवाई टाळण्याकरिता सिटीलिंककडून प्राप्त अधिकृत कार्डच जवळ बाळगणे आवश्यक असल्याचे सिटीलिंक प्रशासनाने सांगितले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जालना येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला नाशिकमध्ये अटक

अधिकृत पास बाळगा:
सिटीलिंकचा प्रवास करतांना प्रवाशांनी अधिकृत पास जवळ बाळगून त्यावरच प्रवास करावा. अन्यथा दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे डुप्लिकेट पास बाळगणाऱ्या प्रवाशांचे धाबे दणाणले आहे. प्रवाशांनी कड़क पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here