नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
अयोध्येतील सोहळ्यानिमित्त आयोजन, २२ ला दीपोत्सव
नाशिक (प्रतिनिधी): अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त शहरातील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात २० ते २२ जानेवारीदरम्यान महोत्सव होणार आहे.
त्यात कारसेवकांचा सत्कार, सामूहिक रामरक्षा पठण, नाशिकच्या कलावंतांचे गीतरामायण आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. मंदिरात २२ जानेवारी रोजी दीपोत्सवही होणार असून त्यात २५०० हजारपेक्षा जास्त दिवे प्रज्वलित केले जातील.
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरातही जय्यत तयारी करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दलासह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने विविध भागांत अक्षता वाटप केले जात आहे.
देशभरात श्री काळाराम मंदिराचेही विशेष महत्व आहे. वनवासाच्या काळात भगवान श्रीरामांनी काही काळ पंचवटीत वास्तव्य केले होते. त्यामुळेच श्री काळाराम मंदिरातही २० ते २२ जानेवारीदरम्यान हा उत्सव साजरा केला जाईल.
या सोहळ्यात कारसेवकांचा विशेष सत्कार केला जाईल. नाशिकमधील सर्व कलाकार सामुदायिक गीत रामायण सादर करतील तर ५००० पेक्षा अधिक नागरिक सामुहिक रामरक्षा पठण करतील.
शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे:
राम मंदिर सोहळ्यानिमित्त श्री काळाराम मंदिरात तीन दिवस महोत्सव होणार आहे. मंदिरात २२ जानेवारीला दीपोत्सव सोहळा होणार आहे. नागरिकांनीही मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी व्हावे. – मंदार जानोरकर, विश्वस्त, काळाराम मंदिर
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790