नाशिक: लाचखोर ईपीएफओ आयुक्तांसह तिघांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): येथील कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीच्या (ईपीएफओ) कार्यालयात दोन लाखांच्या लाचप्रकरणी ‘सीबीआय’ने अटक केलेले विभागीय आयुक्त संशयित गणेश आरोटे, अंमलबजावणी अधिकारी अजय आहुजा, ईपीएफओ एजंट बी. एस. मंगलकर यांना जिल्हा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या सायकलपटूंनी रॅलीतून दिला 'माझा भारत - माझं मत'चा संदेश

तिघांची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. २८ डिसेंबरला ‘सीबीआय’च्या पथकाने ही कारवाई केली होती. एका कंपनीच्या प्रकरणात दोन लाखांची लाच स्वीकारताना ‘सीबीआय’चे पोलिस निरीक्षक रणजितकुमार पांडे, गजानन देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली होती.

संशयितांच्या घरझडतीत मालमत्तांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. संशयितांतर्फे जामीन अर्ज दाखल केले असता, त्यावर दोन दिवसांत सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790