पुणे-नाशिक महामार्गावर ओव्हरटेक करतांना धावत्या कारवर आयशर टेम्पो कोसळला; चार जणांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): राज्यासह देशभरात भीषण अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावर काल (रविवारी) रात्रीच्या सुमारास भीषण अपघातात ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

भरधाव वेगात जाणाऱ्या कारवर आयशर टेम्पो कोसळला. ओव्हर टेक करत असताना झालेल्या या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

ही दुर्दैवी घटना संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावाजवळ घडली आहे. या भीषण अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी; तीन तासांत १०.४ मिमी पावसाची नोंद, आज (दि. २६) यलो अलर्ट कायम

सुनील धारणकर (वय 48 वर्ष), आशा सुनील धारणकर (वय 42), ओजस्वी धारणकर (वय 2 वर्ष), आणि अभय सुरेश विसाळ अशी अपघातातील मृत व्यक्तींची नावे आहेत. तर अस्मिता अभय विसाळ या महिलेला ग्रामस्थांच्या मदतीने वाचवण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. ते पुण्याहून नाशिकच्या दिशेने निघाले होते. संगमनेर परिसरातून ते जात असतानाच समोरून जात असलेल्या आयशर टेम्पोला कारने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचक्षणी आयशर टेम्पो कारवर कोसळला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जालना येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला नाशिकमध्ये अटक

या भीषण अपघातात कारचेसुद्धा मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच चंदनापुरी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले. पोलिसांनी देखील वेळेवर घटनास्थळी धाव घेतल्याने एका महिलेचा जीव वाचवण्यात यश आलं आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक महापालिकेची अतिक्रमणाविरुद्ध मोहीम आजपासून पुन्हा सुरू...

मृतांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि एका दोन वर्षीच्या चिमुकलीचाही समावेश आहे. या घटनेनंतर नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून तासाभरात वाहतूक सुरळीत केली. या घटनेमुळे हळहळ वक्त केली जात आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here