नाशिक: मुंबई नाक्यावरील वाहतूक बेटाचा आकार कमी करण्यास प्रारंभ !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई नाका चौकामधील वाहतूक कोंडीच्या समस्येत दिवसेंदिवस भर पडत असून सायंकाळच्या वेळी तर वाहनचालकांना सर्कल मार्गक्रमण करताना नाकीनऊ येते.

या ठिकाणी द्वारका, मुंबईनाका आणि इंदिरानगर बोगदा या परिसरातून सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणामध्ये एकाच वेळी वाहने येतात. त्यामुळे मुंबई नाका येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते.

हे ही वाचा:  नाशिक शहरातील 'या' वाहतूक मार्गात ९ नोव्हेंबरपर्यंत महत्वाचा बदल !

दरम्यान ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई नाका येथील सर्कल चोहोबाजूंनी कमी करण्याच्या कामास राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरणच्या वतीने प्रारंभ करण्यात आला. सर्कल अरुंद झाल्यावर तेथे सिग्नल कार्यान्वित करण्यात येणार

आहे. शहरातील द्वारका नंतर सर्वाधिक वर्दळ असलेल्या मुंबई नाका चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिका आयआयटी पवईची मदत घेणार होती. पण या सर्वेक्षणासाठी आयआयटी पवईने १७ लाखांची मागणी केल्याने महापालिका हा नाद सोडला होता. या ठिकाणी वाहतूक कोडी फोडण्यासाठी मुंबई नाका सर्कलचा घेर कमी करण्यास पसंती दिली.

हे ही वाचा:  नाशिक: स्टॉक ट्रेडिंगच्या बहाण्याने दाम्पत्याने केली दोन लाखांची फसवणूक

सर्वेक्षण कामापोटी सतरा लाख खर्च:
शहराच्या वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने हा विषय अत्यंत महत्वपूर्ण असल्याने पालिकेचा बांधकाम विभागाने हे काम आयआयटी पवईकडून सर्वेक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यासाठी पत्रव्यव- हारही करण्यात आला. पण सर्वेक्षण कामापोटी सतरा लाख खर्च येईल असे महापालिकेला कळविण्यात आले. मुंबई नाका येथील वाहतूक बेटाचे थेट दोन भागाचे काम करण्यास प्रारंभ करण्यात आला. याबाबत मुख्यमार्ग म्हणजे मुंबईकडून द्वारकाकडे जाणारा मधला रस्ता हा विनाअडथळा करण्यात येणार असल्याचे रस्ता प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790