नाशिक: लैंगिक अत्याचार करणारा संशयित अवघ्या 8 तासांत जेरबंद

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पंचावन्न वर्षीय महिलेच्या अगतिकेचा फायदा घेत लैंगिक अत्याचार करणाऱ्या पंचवटीतील २३ वर्षीय नराधमाला पंचवटी पोलिसांनी आठ तासांत जेरबंद केले आहे.

या संशयिताला बुधवारी (ता. ६) न्यायालयात हजर केले जाणार आहे. मनोज ऊर्फ टिल्लू अण्णा पवार (रा. नवनाथनगर, पंचवटी) असे संशयित नराधमाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेतील ५५ वर्षीय महिला फिर्याद नोंदवीत असतानाच पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांनी तपास पथकास सूचना केल्या. त्याअन्वये पथकाने मनोज पवारची माहिती काढत त्याला नवनाथनगर मधून पकडले.

हे ही वाचा:  नाशिक: चेन स्‍नॅचरसह दोघा सराफांना 3 वर्षे सश्रम कारावास !

घटनेतील पीडित ही रविवारी (ता. ३) रात्री आठ वाजता शेजारीच राहणाऱ्या ओळखीच्या महिलेस ‘जेवण झाले का’ असे विचारण्यास गेली होती. त्याचवेळी ही महिला व तिचा साथीदार टिल्लू हा घरात मद्यपान करत होता.

अतिसेवनाने ही महिला झोपून गेली. त्याचाच फायदा घेत नशेतील टिल्लूने पीडितेस घरात ओढून नेत तिचे तोंड दाबून लैंगिक अत्याचार केले. पीडित ही काही दिवसांपासून आजारी असतानाही तिने टिल्लूच्या कृत्यास विरोध केला, मात्र त्याने तिला दमदाटी करून अत्याचार केले.

हे ही वाचा:  नाशिक: आदर्श आचार संहिता कालावधीत 'हे' निर्बंध राहतील लागू !

तिने कशीतरी सुटका करून घेतली व स्वतःच्या घरात येऊन लपली. त्याचवेळी टिल्लू पुन्हा तिच्या घरात शिरला व पुन्हा अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी टिल्लू पुन्हा महिलेच्या घरात आला व त्याने धमकावत ‘प्रकरणाची वाच्यता केली तर जीवे ठार करेन’ अशी धमकी दिली.

हे ही वाचा:  नाशिक: प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा अपघात, चार जण जखमी

मात्र, पीडितने न घाबरता स्थानिकांच्या मदतीने हिंमत करून पंचवटी पोलिसांना कळविले. त्यानुसार पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी टिल्लूची हिस्टरी व लोकेशन काढत ताब्यात घेतले.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या सूचनेने गुन्हे शोध पथकाचे एपीआय मिथुन परदेशी, एएसआय अशोक काकड, हवालदार अनिल गुंबाडे, महेश नांदुर्डीकर, पोलिस नाईक जयवंत लोणारे, अंमलदार वैभव परदेशी, कुणाल पचलारे, गोरक्ष साबळे यांनी ही कामगिरी केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790