नाशिकला 100 पीएम ई- बसचे गिफ्ट

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): तीन लाख व त्यापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम ई- बस सेवेअंतर्गत नाशिक शहराला शंभर बसचे गिफ्ट मिळाले आहे. (Gift of 100 PM E Bus to Nashik news)

हे ही वाचा:  नाशिक: ऑनर किलिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टात आरोपीला २० वर्षे कारावास

२०११ च्या जनगणनेनुसार तीन लाख व त्याहून अधिक लोकसंख्येचे शहरे या योजनेत केंद्रशासित प्रदेश ईशान्य प्रदेश आणि पर्वती राज्यांमधील सर्व राजधानी शहरे समाविष्ट आहेत. या योजनेंतर्गत संघटित बससेवा नसलेल्या शहरांना प्राधान्य देण्याचे नियोजन होते.

त्याअंतर्गत पीएम बस सेवा सुरू करण्यात आली आहे. पीपी मॉडेलवर शहर बस ऑपरेशन वाढविण्यासाठी ही योजना आहे. यात केंद्राचा वीस हजार कोटींचा वाटा असून उर्वरित वाटा राज्यांना उचलावा लागणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातर्फे निर्बंध जारी!

महाराष्ट्रात कल्याण, डोंबिवली, ठाणे, नाशिक लातूर, नवी मुंबई, पुणे या शहरांना बस देण्याचे नियोजन आहे. नाशिक शहरासाठी या योजनेंतर्गत शंभर बसची घोषणा करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: रेल्वे तिकीट आरक्षणाच्या नियमात मोठा बदल; फक्त इतके दिवस आधी करता येणार बुकिंग

महापालिकेतर्फे सिटी लिंक कंपनीच्या माध्यमातून बससेवा चालवली जाते. सध्या अडीचशे बस शहरात सुरू आहेत. पीएम योजनेअंतर्गत आता शंभर बसची भर पडणार असल्याने नाशिकची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यानिमित्ताने बळकट होण्याची आशा आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790