नाशिक: भरधाव अ‍ॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील बारा वर्षीय बालकाचा मृत्यू…

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): पाईप लाईनरोड भागात भरधाव अ‍ॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील बारा वर्षीय बालक ठार झाला. या अपघातात मृत मुलाचे वडिल गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ-२०२७च्या विकासकामांना गती द्या; दर्जाशी तडजोड सहन केली जाणार नाही : मंत्री गिरीश महाजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपेश दिपक निकम (१२ रा.साईकृपा अपा.सोमेश्वर कॉलनी,सातपूर) असे मृत बालकाचे नाव आहे. दिपेश रविवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास वडिल दिपक निकम यांच्या दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. सोमेश्वर कॉलनी कडून पाईपलाईनरोडने दोघे बापलेक एमजी रोडच्या दिशेने प्रवास करीत असतांना नगरसेविका नयना गांगुर्डे यांच्या संपर्क कार्यालय परिसरात भरधाव एमएच १५ एके ५९८५ या अ‍ॅटोरिक्षाने दुचाकीस धडक दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘अमृत’ मार्फत 'पराक्रम दिना' निमित्त १ ते १५ ऑगस्टदरम्यान राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन

या अपघातात निकम बापलेक गंभीर जखमी झाले होते. त्यांना श्री गुरूजी हॉस्पिटल येथे दाखल केले असता सोमवारी सकाळी डॉ.विक्रम सैनी यांनी दिपेश निकम या बालकास मृत घोषीत केले. अधिक तपास उपनिरीक्षक झाडे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790