नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सातपूरच्या ध्रुवनगरमध्येही खंडोबा महाराज मंदिर परिसरात रविवारी (दि. ३) अज्ञात ४ टवाळखोरांनी तीन वाहनांची तोडफोड केली. हे चौघेही सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून त्यांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष जाधव यांच्या घरासमोरील पार्किंगमध्ये उभ्या स्विफ्ट कार (एमएच ०२ सीडब्ल्यू ८९२), याच ठिकाणी उभ्या गिरीश तिलनकर यांच्या कार (एमएच ४१ व्ही ५२६१), ध्रुवनगर पाण्याच्या टाकीमागे अशोक काळे यांची स्कूल व्हॅन (एमएच १५ एफव्ही ७०६५) या वाहनांच्या दोन्ही काचा फोडल्या.
तर याच परिसरातील एका भाजी विक्रीच्या दुकानाचीही तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.
गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. यात एक माथेफिरू निदर्शनास आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानुसार गंगापूर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. परिसरात गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
![]()


