नाशिक: चौक मंडईत वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी पाच जणांना अटक

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): आपापसात एकमेकांना मारहाण करून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्याजवळील धारदार शस्त्रांनी हल्ला करून वाहनांची तोडफोड करून नुकसान केल्याप्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस नाईक दीपक रेहरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी आवेश निसार शेख (रा. चौक मंडई, जुने नाशिक), शाहरुख ऊर्फ बिया पठाण (रा. नागसेननगर, नाशिक), अहमद रजा (रा. वाकडी बारव) व त्याचे पाच ते सहा साथीदार, जुल्फीकार ऊर्फ अली कुरेशी (रा. कसाई वाडा, नाशिक), फरीद मोबिन कुरेशी (रा. कुरेशीनगर, वडाळा नाका), आजम हवीद कुरेशी (रा. वडाळा नाका, नाशिक), फहिम शकील कुरेशी (रा. वडाळा नाका, नाशिक), सलमान शकुर कुरेशी (रा. बागवानपुरा), आवेश अल्ताफ शेख (रा. कुरेशी वाडा) व त्यांचे इतर तीन ते चार साथीदार (सर्व रा. वडाळा नाका) यांनी संगनमत करून दि. २ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास चौक मंडईतील शालिमार बेकरीसमोरील चौकात गैरकायद्याची मंडळी जमवून आपापसात एकमेकांना शिवीगाळ, मारहाण व दमदाटी केली, तसेच जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्याजवळी धारदार शस्त्रांनी हल्ला करून तेथे असलेल्या वाहनांची तोडफोड करून नुकसान केले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 30 ऑक्टोबरला आयोजन

या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरीद कुरेशी, आजम कुरेशी, सलमान कुरेशी, आवेश शेख व फहिम कुरेशी या पाच जणांना अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.(गुन्हा रजिस्टर क्रमांक: ०४०२/२०२३)

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790