नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ट्रक आणि जीपमध्ये पहाटे झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंचर जवळ पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. नाशिकवरुन भोसरीच्या दिशेने जात असताना जीपने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली यामुळे हा भीषण अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की जीपच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.
रस्त्यावर दाट धुके असल्यामुळे समोरील ट्रकचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अपघातात जीपमधील एकच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देखील समोर आहेत.
गंभीर जखमींना मंचर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक मदतीसाठी धावले. पाोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. पंकज खंडू जगताप (वय ३६), मधुकर तुकाराम अहिरे (वय ५२), शांताराम संभाजी आहिरे (वय ५०) सर्व रा. जायखेडा अशी मृतांची नावे आहेत.