नाशिक: सातपूरला पिंजऱ्यात अडकला बिबट्या: दुसऱ्या बिबट्यासाठी पिंजरा

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): सातपूर मळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी दिसणारा बिबट्या अखेर बुधवारी (दि. २९) रात्री ९ वाजेदरम्यान बजरंगनगर परिसरातील पिंजऱ्यात कैद झाला.

यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी परिसरात आणखी दोन बिबटे असण्याच्या शक्यतेने वनविभाग येथे पुन्हा पिंजरा लावणार असल्याचे सांगण्यात आले.

⚡ हे ही वाचा:  पोलिसांच्या समर्थनार्थ लावलेली होर्डिंग्ज काढावीत – नाशिक शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गेल्या आठवड्यापासून शहरातील विविध भागांमध्ये बिबट्या दिसून येत आहे. सावतानगर, गोविंदनगरमधील बिबट्याची चर्चा अजूनही ओसरली नसताना अंबड, मखमलाबादलाही बिबट्या दिसून आला आहे. त्यातच आता सातपूरलगतच्या योगेश आहेर व निगळ मळा, अण्णाचा मळा दादोबारोड, बजरंगनगर येथे सीसीटीव्हीत बिबट‌्याचा वावर कैद झाल्याने परिसरात भीती पसरली होती. त्यामुळे या परिसरात पिंजरा देखील लावण्यात आला होता.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरातील सहायक पोलीस आयुक्तांची खांदेपालट

त्यात एक बिबट्या अडकल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी पुन्हा पिंजरा लावणार असल्याचे वनरक्षक अनिल अहिरराव यांनी सांगितले. दरम्यान, या परिसरात हॉटेल, ढाबे, मटन मार्केट, मच्छी विक्रेते असल्याने बिबट्या भक्ष्य शोधण्यासाठी वासाने येत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here